मायबोली
मायबोली
मराठी आपली मायबोली,
मराठी आपला बाणा
विविध प्रकारच्या
अध्यात्माची ज्योत
ज्ञानाचा अथांग श्रोत ,
भडकली तर तोफ फेकली तर गोफ
प्रयत्नातील जिज्ञासा
कल्पनेतील चिकित्सा
नात्यागोत्यातील भरवसा
संत ज्ञानेश्वरांचे पसायदान
मायबोली मराठी नांदते साता समुद्रापार
मराठी भाषा,मराठी मनाच मराठी लेण
खरंच कौतुकास्पद वाटत मराठमोळ जगण
मराठी प्रत्येकाच्या हृदयाचा झंकार,
मराठी सर्व यशाचे द्वार
"अमृतातेही पैजा जिंके"
ज्ञानोबा सांगती
मराठीला जराही लेखू
नका कमी
शक्य होत असेल तर
मराठीतून बोला
नेहमीच ठेवा हे ध्यानीमनी..
