आरसा
आरसा
जातो बराच वेळ
बघण्यात आरसा
कामाला वेळच
नाही मिळत फारसा
आरसा दाखवतो आपले
मोहक रूप आणि रंग
न्याहळण्यात स्वतःला
सारेच होतात दंग
दाखवी आपल्याला
आपलेच प्रतिबिंब
लपवत नाही त्यावरील
छोटासाही टिंब
करत नाही कोणाचीच
खोटी कधी स्तुती
खरे दाखवण्याची नेहमीच
असते त्याची नीती
आरश्यासारखे स्वच्छ
आपुले चारित्र्य असावे
डाग मात्र त्यावर
कसलेच नसावे
आरसा खुलवी व्यक्तिमत्व
अन् देई आत्मविश्वास
आरशाविना जीवन वाटे
कसे भकास
