STORYMIRROR

Nandini Menjoge

Abstract Fantasy Others

3  

Nandini Menjoge

Abstract Fantasy Others

निःशब्द

निःशब्द

1 min
160

क्षण सुटले निमूट सरले... 

हर्षाच्या कुसुमांवर टवटवीत 

सुगंध उल्हासाचा उधळत 

क्षण हसले निशब्द सरले.... !!


कोड्यांचा लपंडाव रंगवीत 

अविचारी त्या परिस्थितींत 

नागमोडी आखणी मांडीत 

क्षण हरले निशब्द सरले... !!


जीव अलगद डोकावत 

बंधनात त्यांस जखडून 

तिमिर कायम जागवत 

क्षण भंगले निशब्द निजले ... !!


आप्त स्पृहा तृप्त करत 

कौतुकाची वदने साठवीत 

प्रेरणेचा प्रवाह दटावून 

क्षण निशब्द सजले सोनेरी रेखाटले.. !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract