Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mita Nanwatkar

Abstract Classics Fantasy

3  

Mita Nanwatkar

Abstract Classics Fantasy

क्षण काही हरवलेले

क्षण काही हरवलेले

1 min
290



क्षण काही हरवलेले

अजुनही ताजे आहे

स्मृतींच्या गावी माझ्या

चमकते काजवे आहे

हळव्याश्या हृदयांगणी

पैंजणांचे वाजणे आहे

कोऱ्या तळहाती जणू

मेहंदीचेच रंगणे आहे

चैतन्यमयी उषा:कालचे

सोनेरी किरणे आहे

अतृप्त अशांत धरेवर

सरींचे  सांडणे आहे

जादूच्या स्वप्ननगरीत

कुशीवर निजणे आहे

ओंजळीत येवून पडलेले

सुंदर असे चांदणे आहे

निसटणाऱ्या जीवनाचे

कदाचित सांगणे आहे

परत कधी न येणाऱ्या

जीवाचे या मरणे आहे

हरवलेल्या क्षणांचे मोल

हृदयी साठवणे आहे

गंध सुगंधित फुलांचे

सभोवती पसरणे आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract