STORYMIRROR

Mita Nanwatkar

Abstract Classics Inspirational

4  

Mita Nanwatkar

Abstract Classics Inspirational

हिरवाईचं लेणं

हिरवाईचं लेणं

1 min
285

असहनीय होता, ग्रीष्माची झळ 

मेघांना जाणवली,सृष्टीची कळ 


सरला दुष्काळ,बरसला श्रावण

सृजन सरींत,भिजला कणकण


वसुधेने चढवलं, हिरवाईचं लेणं 

डोळ्यांत साठलं, निसर्गाचं देणं


चराचरात दरवळला,चैतन्य गंध

हृदयात उमटला, मखमली बंध


हरित पालवीने,दुरावली मरगळ 

चौखूर वाढली,प्रसन्नतेची वर्दळ  


रानावनात मोहरले,रोप कोवळे

मातीत साजरे,सुखावह सोहळे


सुख समृध्दीने,शेतकरी आनंदी

फांदीवर पाखरे,उडती स्वच्छंदी


नजरेत दाटली, देखणी हिरवाई

काव्यात रचली,मनाची नवलाई


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract