STORYMIRROR

Mita Nanwatkar

Abstract Romance Fantasy

2  

Mita Nanwatkar

Abstract Romance Fantasy

ऋतू हिरवा

ऋतू हिरवा

1 min
56

आषाढ सरींना गवसला

पावसाचा सूर ताल नवा

चराचरात ओतून चैतन्य

गंधाळला हा ऋतू हिरवा

वृक्षवल्लींच्या नव्हाळीने

नैराश्य तिमिरही लोपला

गार गार शिरव्यात बेधुंद

इंद्रधनू हृदयीचा सजला

मृद्गंध भिनता हा श्वासात

उदासीनता पावली भंग

प्रसन्न दिशा दावूनी गेला

बहुरंगी सुमनांचा सत्संग

मखमली तेजस्वी तृणांनी

दुतर्फा सजली पायवाट

चांदव्यात भिजूनी काया

अंतरंगात उसळली लाट

काळ्या मातीत वाहिली

सृजनाची अनोखी धारा

अपेक्षित धान्य राशीचा

डोळ्यांत चमकला तारा

उष्ण झळांनी ग्रासलेला

विसावला भाव कोवळा

कणकणही मिरवी नेटाने

सृष्टीचा नवजन्म सोहळा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract