STORYMIRROR

Mita Nanwatkar

Abstract Fantasy

2  

Mita Nanwatkar

Abstract Fantasy

चिंब भिजलेले

चिंब भिजलेले

1 min
95

आषाढ घन हे

दाटूनिया आले

थेंब  अलवार

आज  बरसले

चिंब भिजलेले

मन माझे ओले

जाण अंतरीची

नभांगणी डोले

प्रीत सुमनांनी

भाव गंधाळले

शीत चांदव्यात

सौंदर्य खुलले

शब्द ओसरले

काव्यात सजले

अव्यक्त प्रेम हे

आनंदात न्हाले

निजलेले स्वप्न

 वर डोकावले

सुप्त इच्छांचेही

तारे चकाकले

भाव भावनांचे

मोती  गवसले

सुखी जीवनाचे

गणित जुळले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract