व्यथा
व्यथा
काय म्हणून दाखवाव्या कुणाला ,आपल्या हृदयाच्या व्यथा
का झुकवावी नजर,का टेकावा माथा
तुटलेल्या काचाप्रमाणे मनाचेही तुकडे झाले,
दु:ख वेचण्यात आयुष्याचे आयुष्यही उणे झाले
वाटल अचानक
जीवनात माझ्या तो क्षण यावा,
सुखाचा झरा कधी खळखळून वहावा
नियतीचे चक्र पुन्हा घेर घेऊनि आले
आटल्या भावना पण डोळ्यातूनी पूर फार गेले
