STORYMIRROR

Minakshi Wakode

Abstract

2  

Minakshi Wakode

Abstract

मौन

मौन

1 min
85

आठवणीत तुझ्या रमताना,हसायचीस तू त्या फोटोफ्रेममधूनही

आज का चुकवतेस नजर,

 तू समोर असतानाही.

राहिला न आज बाकी आपला संवाद इथे

तुझ्यासाठी टोचणारा काटा आणी गुलाबही मीच इथे

असह्य नाही आज मज ते तुफान ते वादळ

घायाळ करते आज मजला तुझ्या मनातील दाटलेल्या शब्दांची वर्दळ.

उघड आज प्रिये तुझ्या मौन हृदयाची कवाडे

येऊ दे ओठावर शब्द ,गुंजू दे आसमंती

प्रीतीची गझल नी पोवाडे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract