बाप
बाप
आयुष्यभर घेतले तुम्ही
आमच्यासाठी कष्ट,
पण सुखाचा क्षण कधी अनुभवता आला नाही
कर्तव्यरूपी सागरातून,
विसाव्याचा किनारा कधी गाठताच आला नाही
बघितलंय आई बाबा मी तुम्हाला
पोटास मारताना,
पोटभर जेवण आम्हाला भरवताना
धगधगत्या उन्हात तुम्ही सोसलेले चटके
पायातील चप्पल तुटकी अंगावरील कपडे फाटके
आठविते आजही बाबा तुमच्या
तळहातावरील फोड,
आमच्यासाठी केलेली आयुष्याशी तडजोड
खडतर प्रवास हा तुमचा कधी थांबलाच नाही,
खरंच माझा बाप कधी जगलाच नाही
