उधाणलेल्या लाटा
उधाणलेल्या लाटा
सागराच्या किनाऱ्यावर उधाणलेल्या लाटा..
उधाणलेला सागर त्याचा गजबजलेला किनारा..
गजबजलेली गलबते नि जहाजांचा जत्था..
जहाजांचा जत्था तिथे माणसांचा कल्ला..
माणसांचा कल्ला नि फुकटचा सल्ला..
फुकटचा सल्ला नि विचारांचा गुंता..
विचारांचा गुंता नि मनात चिंता..
मनातल्या चिंता नि हजारो वाटा
हजारो वाटा तिथे सागराचा किनारा..
सागराच्या किनाऱ्यावर उधाणलेल्या लाटा..
