STORYMIRROR

Shital Kuber

Others

4  

Shital Kuber

Others

वाट...

वाट...

1 min
376

नदी डोंगरा जन्मते.. तिला ओढ सागराची..

सर्व घेते ती पोटात...तिची विरहाची वाट...


कुंतीचा तो कर्ण ..दानशूर महारथी..

नाही चुकली नियती...त्याची संघर्षाची वाट...


प्रकाशाचा कवडसा..वसे आनंदवनी..

कुष्ठरोगांच्या सेवेसाठी..त्याची सेवामयी वाट..


अनाथांची माऊली..माय असे सिंधुताई..

देई सर्वांना भाकर ..तिची वनवासी वाट..


असोनि राजपुत्र..झाला सुखास पारखी..

दुःख त्याच्या हृदयात ..बुद्ध शांततेची वाट


निराशेच्या गर्तेत..फुटे अंकुर आशेचा..

यशाच्या मार्गावर..नाही परतीची वाट...


बुद्धीच्या साथीने..माणसा बन माणूस..

धर निसर्गाची साथ..तुझी प्रगतीची वाट..


Rate this content
Log in