STORYMIRROR

Shital Kuber

Others

4  

Shital Kuber

Others

एक होती गोष्ट

एक होती गोष्ट

1 min
185

एक होती गोष्ट...

समुद्राच्या लाटेची...

त्याच्या मोठ्या गाजेची...

त्याच्या अथांग पाण्याची..


एक होती गोष्ट...

आकाशातल्या सूर्याची...

त्याच्या कोवळ्या उन्हाची..

त्याच्या मिठीतल्या सरीची...


एक होती गोष्ट...

मनातल्या चांदण्यांची...

पौर्णिमेच्या चंद्राची..

अमावस्येच्या रात्रीची....


एक होती गोष्ट...

सावळ्या कृष्णाची...

त्याच्या मधुर बासरीची...

नि एका वेड्या राधेची...


एक होती गोष्ट..

शिशिरातल्या हिमाची...

श्रावणाच्या सरीची..

ग्रीष्माच्या दाहेची...


एक होती गोष्ट...

तिच्या त्याच्या प्रेमाची...

त्याच्याइतकी शहाणी...

नि तिच्याइतकी वेडी....


Rate this content
Log in