Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Shital Kuber

Others

2.1  

Shital Kuber

Others

जगण्यातील मर्म...

जगण्यातील मर्म...

1 min
403


सोड तुझी तू गोंधळलेली नजर...

आणि वसव तुझ्यात तू ज्ञानाचे शहर..

लोक निंदा करण्यात राहतील गर्क...

पण त्यात पण गवसेल तुला जगण्यातील अर्क...

जगाच्या बाजारात लागेल तुझ्यावर बोली...

म्हणून का तू दिलेला शब्द मोडशील..

सोड नकोस तू सरळ राहण्याचा मार्ग..

कारण नरक सुद्धा होईल तुझ्यामुळे स्वर्ग...

जरी सरळ चालताना टोचतिल काटे...

कदाचित नशिबाचे उलटतील सुंदर फासे..

राहा तू सदा कामात व्यग्र...

प्रसन्न राहील त्याने तुझेच चित्त..

बघायची आहे तुझ्यात मला आत्मविश्वासाची चमक...

नि बोलण्यात आलेली अभिमानाची जरब..

लोकांना कदाचित वाटेल तुझ्यात गर्व..

पण यातसुद्धा सामावलेलं असत जगण्यातील मर्म...

पण यात सुद्धा सामावलेलं असत जगण्यातल मर्म...


Rate this content
Log in