STORYMIRROR

Shital Kuber

Others

3  

Shital Kuber

Others

वेडं मन

वेडं मन

1 min
234

किनाऱ्याने सावरायचे कसे...

जर समुद्राला गहिवर आला तर..


शेतकऱ्याने पेरायचे कसे..

जर मातीचा ओलावा संपला तर...


कोणी पुसायचे कसे...

जर आकाशाला अश्रू आले तर..


वाटेने चालायचे कसे...

जर धुके फार दाटले तर...


डोंगराने जगायचे कसे...

जर नद्या दूर गेल्या तर..


आकाशाने चमकायचे कसे

जर चांदण्या नसतील तर...


चित्र रंगवायचे कसे...

जर रंगच नसतील तर..


आवरायचं कसं..

जर वेडं मन उधानलं तर...



साहित्याला गुण द्या
लॉग इन