STORYMIRROR

Shital Kuber

Others

4  

Shital Kuber

Others

यायचं तर या

यायचं तर या

1 min
475

यायचं तर या...

रक्षण करायला या...

मेणबत्त्या पेटवायला नको...

शत्रू म्हणून या मित्र म्हणून या...

पण दिलदार बनून या...

कपटी बनून नको...


यायचं तर या...

स्वबळावर या...

लाचारी पत्करून नको...

भिक मागून नको की

हतबल होऊन नको...

स्वतःच्या जीवावर या...


यायचं तर या...

शिशिरातला हिम बनून या...

ग्रीष्मातला उकाडा बनून नको...

दंगलीमध्ये जाळपोळ करायला नको...

बघ्यांच्या गर्दीत नको...

तर मदतीचा हात बनून या...


यायचं तर या...

चांगलं घडवायला या...

बिघडवायला नको...


साहित्याला गुण द्या
लॉग इन