STORYMIRROR

Shital Kuber

Others

3  

Shital Kuber

Others

बाई..

बाई..

1 min
166

चालणाऱ्या पायांमध्ये.

झुंजणाऱ्या हातांमध्ये..

दिसते मला रूप बाई..

'झाशी'च्या त्या राणीचे..


शिकण्याच्या ध्येयामध्ये..

लिहिणाऱ्या बोटांमध्ये..

दिसते मला रूप आई..

'सावित्री'च्या लेकीचे..


मनगटाच्या समर्थ्यामध्ये..

बुद्धी नि कर्तृत्वामध्ये...

दिसते मला रूप बाई..

'कल्पना'च्या भरारीचे...


स्वराज्याच्या निर्मितीमध्ये..

संस्काराच्या बिजामध्ये...

दिसते मला रूप आई..

'जिजाऊ'च्या शिवबाचे...



साहित्याला गुण द्या
लॉग इन