एकटी....
एकटी....
1 min
346
पुन्हा पुन्हा पाऊस पडतो कशाला..
सारखीच पानांची सळसळ एकटी....
कशास लागतो इतका पैशाच्या मागे..
दुसऱ्याचा तळतळाट नि तुझी हाव एकटी..
ती धुंद कुठल्याच मैफिलीत नाही..
फक्त रंगते तुझी मैफिल एकटी..
कशास फिरतो मागे मृगजळाच्या...
तशी तुझी सावली एकटी...
ओळी ओळींमधून सुचत जाते...
तशी माझी गझल एकटी...
समुद्राची ही कसली भरती..
लाटांवर तुझी बघ नाव एकटी...
कशास गाता गोडवे प्रेमाचे..
राधा कृष्ण म्हणता मीरा एकटी...
कशास करता बाष्कळ चर्चा ...
येणार नाही सत्ता एकटी....
