STORYMIRROR

Shital Kuber

Others

4  

Shital Kuber

Others

माणसा वाग माणसासारखा

माणसा वाग माणसासारखा

1 min
425

मांडलेला डाव आहे...

फसलेला खेळ आहे..


प्रश्नांच्या गुलदस्त्यात..

उत्तराचा काटा आहे..


समुद्राची लाट आहे..

किनाऱ्याला माज आहे..


उथळ ओढ्याचे पाणी..

डोह नदीचा खोल आहे..


कस्तुरीच्या शोधात मृग..

त्याच्याचजवळ कस्तुरी आहे...


कुरूप आहेस म्हणून निराशा...

उद्याचा तू राजहंस आहे..


पळतोस मृगजळाच्या मागे..

तहान तुझी खूप आहे...


धर्माधर्मात युद्ध आहे..

नात्यांची सैल वीण आहे..


मांडलेला बाजार आहे..

साचलेला गाळ आहे..


दोन शब्दांचे प्रेम आहे..

लिहिलेली तुझ्यावर ओळ आहे..


माणसा वाग माणसासारखा..

निसर्ग तुझा मित्र आहे..


साहित्याला गुण द्या
लॉग इन