सावळबाधा
सावळबाधा
1 min
398
गर्द निळाई आकाशाची...
भिजली पाने वनराईची...
धून पडली बासरीची...
व्याकुळ राधा मनमंदिरी..
धनु दाटले रे आकाशी...
झाली सावळ बाधा गोकुळीं..
सावळा कृष्ण नि सावळ नगरी...
रासलीला रंगली नदीकिनारी..
राधा राधा कृष्ण पुकारी..
मेघ सावळे पुन्हा गरजती..
धारा धारा धार बरसती..
राधा कृष्ण नाही वेगळी..
कृष्ण सखा नि प्रेमळ गोपी...
कृष्ण पाहुनी मनात झुलती...
सावळे कौतुक हे पाहुनी ...
आकाशी पण बाधा झाली..
