सत्य
सत्य
धडपडत्या सत्यासाठी
हरवलेल्या संध्याकाळच्या अंधारात
बालिश आशेमध्ये सनातन
गोष्टींचा शोध घेत
दैनंदिन पराभवाला
नाश विनाशाला आणि
भिरभिरत्या भीतीचे घोट पचवत
तो पोहोचला...
भेदरलेल्या अंतःकरणानं
वेदनेच्या वलयातून वाट काढत
एकदाचा पोहोचला
या अस्वस्थेच्या उंबरठ्यावर
उंबरठ्याच्या आत दिसले
निर्जीव माणसांचे सृजनहीन पुतळे
पुतळे एकमेकांना वेडावीत होते
ते पुतळे नाकारीत होते
या पृथ्वीवरचा सूर्य, चंद्र
दुःख, दुर्भाग्य, यातनांची दलदल
आणि असंच बरंच काही...
निघालो होतो सनातन गोष्टी शोधायला
पण हाती मात्र काहीतरी वेगळंच लागलं
पण जे लागलं हाती
ते मात्र मेंदूला झिनझिण्या आणणारं होतं
हे मात्र नक्कीच होतं...