खेळ आयुष्याचा
खेळ आयुष्याचा
....कुणी येथे अभागी कुणाचं
नशीबाचं चकाकणारे नाणं
जिवनाच्या खेळात या कुणी
मुर्ख कुणी झालं इथे शहाणं...
...कुणी केली स्वप्न झाली
मग अडगळीत जमा
कुणी स्वप्नाच्या पाठलाग
नाहि जगाची कुठली तमा ...
...रंग- रुप ,पेहराव ,पैसा
कुणाच्या जगण्याची रितं
कुणी मग्न झाल गात
आपलेच वेगळं जिवनगीतं ...
...कुणी करून खुप मंथन
घेत होते भविष्याचा वेध
चालु येथे कुणाचं नोकरीचा
कुणाचा तर बायकोचा शोध ....
....आयुष्याच्या सागरात या कुणी
तरबेज खलाशी कुणी नवखा प्रवासी
कुणी गटांगळ्या खात पोहणे शिकलं
कुणी एकाच लाटेत झालं कैलासवासी...
