ध्यानस्थ्य
ध्यानस्थ्य
मी...
स्वप्नात राहतो,
स्वप्नातच जगतो
मी...
स्वप्नातच हसतो,
स्वप्नातच रडतो
मी...
स्वप्नातच जिंकतो,
स्वप्नातच हरतो
मी...
स्वप्नातच मी,
सुखीही होतो
स्वप्नातच मी,
दुःखीही होतो
मी...
स्वप्नातच मी,
स्वतःशी
स्वतःसोबतच
स्पर्धाही करतो...
मी....
स्वप्नातच मी
लहानही होतो
या स्वप्नातच मी
वयस्कही होतो
मी...
या आयुष्याचे सारे खेळ मी...
या स्वप्नातच खेळतो
मी...
स्वप्नातच मी...
सारे काही करतो
मी...
स्वप्नातच मी...
जन्मही घेतो
स्वप्नातच मी
मृत्यूही घेतो
आणि मग
जागेपणी....?????
आणि मग जागेपणी...
स्वतःच स्वतःला पाहतो,
कुठल्यातरी,
प्रेतासारखा...
अगदी
निवांतपणे...
अगदी
निपचितपने...
कुठेतरी...
कुठल्यातरी...
स्वप्नांच्या दुनियेत,
पहुडलेला...
अगदी,
ध्यानस्थ........!!!!!!!
