STORYMIRROR

Shubham Ughade

Others

3  

Shubham Ughade

Others

कुठेतरी जायचंय...

कुठेतरी जायचंय...

1 min
12K

कुठेतरी जायचंय...

तुझ्यासोबत...

पण कुठे जायचंय...???


जिथे कुणीच आपले नाही,

जिथे कुणीच परके नाही,

जिथे कसलीच बंधने नाही,

जिथे कसलीच जबाबदारी नाही,


जिथे कुणीच लहानही नाही,

जिथे कुणीच मोठेही नाही,

जिथे कुणीच देवही नाही,

जिथे कुणीच दानवही नाही,


जिथे कुठलाच समाज नाही,

जिथे कुठलाच धर्मही नाही,

जिथे कुठलेच संरक्षण नाही,

जिथे कुठलीच भीतीही नाही,


जिथे कुठलेच राज्य नाही,

जिथे कुठलेच देश नाही,

जिथे कुठलीच सीमा नाही,

जिथे कुठलीच तार नाही,


जिथे कुणीच प्रिय नाही,

जिथे कुणीच अप्रियही नाही,

जिथे कुठलीच भाषाही नाही,

जिथे कुठलीच बोलीही नाही,


जिथे कुणीच पाहणारे नाही,

जिथे कुणीच ऐकणारे नाही,

जिथे कुणीच बोलणारे नाही,

जिथे कुणीच लिहिणारे नाही,

जिथे कुणीच वाचणारेही नाही, 


जिथे कुठलाच त्रास नाही,

जिथे कुठलाच ताण नाही,

जिथे कुठलाच विचार नाही,

जिथे कुठलीच चिंताही नाही,


जिथे कुठलीच झोप नाही,

जिथे कुठलीच जाग नाही,

जिथे काहीच कल्पना नाही,

जिथे काहीच स्वप्नेही नाही,


जिथे काहीच खरे नाही,

जिथे काहीच खोटे नाही,

जिथे कुठलेच जगही नाही,


जिथे....

 आपल्या दोघांमध्ये येणारे 

कुणीच नाही...,

कुणीच नाही...,


फक्त आणि फक्त...


तू...

आणि मी...

बोल...


येशील....???


Rate this content
Log in