STORYMIRROR

Shubham Ughade

Abstract Others

3  

Shubham Ughade

Abstract Others

ध्यानस्थ्य

ध्यानस्थ्य

1 min
11.6K

मी... ,

स्वप्नात राहतो, 

स्वप्नातच जगतो


मी... ,

स्वप्नातच हसतो, 

स्वप्नातच रडतो


मी... ,

स्वप्नातच जिंकतो, 

स्वप्नातच हरतो


मी... ,

स्वप्नातच मी ,

सुखीही होतो

स्वप्नातच मी ,

दुःखीही होतो


मी...,

स्वप्नातच मी,

स्वतःशी ,

स्वतःसोबतच

स्पर्धाही करतो...,


मी....,

स्वनातच मी

लहानही होतो

ह्या स्वप्नातच मी 

वयस्कही होतो


मी....,


ह्या आयुष्याचे सारे खेळ मी ...., 

ह्या स्वप्नातःच खेळतो


मी....,

स्वप्नातच मी...

सारे काही करतो 


स्वप्नातच मी...,

जन्मही घेतो,

स्वप्नातच मी

मृत्यूही घेतो


आणि मग

जागेपणी....????? 


आणि मग जागेपणी.....


स्वतःच स्वतःला पाहतो,

कुठल्यातरी,

प्रेतासारखा.....


अगदी 

निवांतपणे....,

अगदी

निपचितपने...,


कुठेतरी...,


कुठल्यातरी...,


स्वप्नांच्या दुनियेत,

पहुडलेला....


अगदी,


ध्यानस्थ........!!!!!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract