STORYMIRROR

Suresh Patil

Abstract

3  

Suresh Patil

Abstract

दैवत

दैवत

1 min
12.5K

वर्षानुवर्षे उभे ठाकलेले

महाकाय पर्वत आहात.

तुम्हीच मायबाप आणि

ह्या गावचे दैवत आहात.!!


कोणी ही प्रश्र्न केलेला

तुम्हाला तो सलत नाही.

तुमच्या आज्ञे शिवाय इथे

पान सुद्धा हालत नाही.!!


गाडी नी घोडे तुम्हां पाशी

आणि पैशांची गुर्मी आहे.

पिढ्यानपिढ्या तुम्हापाशी

गावच्या सत्तेची गर्मी आहे.


मुलाने हात मजबूत करावा

बापाने कमळाची साथ धरावी.

निवडून कोणी ही येऊ देत,

सत्ता तुमच्याचं घरात रहावी !!


दैवत तुम्ही आम्हां मेंढरांचे

कळपाचा नियम मोडतं नाही

अपेक्षा काय ठेऊ तुम्हां पाशी

देवाला ही तुम्ही सोडतं नाही.!!


Rate this content
Log in

More marathi poem from Suresh Patil

Similar marathi poem from Abstract