तुझे सौंदर्य...
तुझे सौंदर्य...




तुझ्या सौंदर्यात सारे जग सामावले
तुझ्या जाण्याने मात्र ते चित्र पालटले...!
तू येतोस तेव्हा आसमंत खुलतो
तू जातोस तेव्हा आनंद रुसतो..!
तुझे कायमस्वरूपी असणे अशक्य आहे
तुझे रोज परतणे मात्र कटू सत्य आहे..!
असंच येत जा न चुकता रोज भेटीला
जाताना असंख्य आठवणी देत जा सोबतीला..!