हरवून गेलेलं बालपण
हरवून गेलेलं बालपण


बालपण म्हणजे होती मज्जा
नव्हता डोक्यामागे कसला ताप
काळजी नव्हती कशाची
नव्हता मागे कशाचा व्याप
बालपण होतं तेव्हा ना
सगळं किती बरं होतं
जे होतं समोर अगदी
सहज आणि खरं होतं
भांडत असलो मित्रांशी तरी
राग मनात धरीत नव्हतो
दोरीच्या उड्या मारत
खूप आनंद मनात होतो
रडणं, पडणं, भोकाड फोडणं
गदागदा हसून लोटपोट होतं
आठ आणेच्या चॉकलेटमधेही
खूप मोठं समाधान होतं
दिवस मजेचे ते यावे फिरुनी
परत यावे ते बालपण
किती सुंदर निरागस होते
हरवून गेलेले ते लहानपण..!