STORYMIRROR

Prashant Shinde

Fantasy

3  

Prashant Shinde

Fantasy

मोरपीस...!

मोरपीस...!

1 min
29.7K


लहान पाणी छंद होता

मोरपीस गळा करण्याचा

आणि तो वर्गात मुलींना

मागायला लावून देण्याचा


जुन्या पुस्तकात किंवा वहीत

सापडेल म्हणून कपाट उघडले

आणि आठवणींचा खजिना

बदाबदा बाहेर पडला


एका वहीत राखत रंगाच्या

ते एक मोरपीस माझी

अजूनही वाट पहात होतं

आज मला ते स्पष्ट दिसत होतं


काय ते दिवस काय त्या आठवणी

खरंच असं बालपण माझ्या

मुलांना मिळालं असतं तर

अजूनही मोरपिस मी गोळा केली असती


मोरपिस मला सांगत होतं

आणि पुन्हा पुन्हा दाखवत होतं

नकट्या नाकावरचा लटका राग

आणि आत आतल्या कप्प्यातलं प्रेम


डोळे भरून आले आणि

मोरपीस ओके झाले

तसे ते गालात खुदकन हसले

म्हणाले मला माहित होतं तू रडणार...!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy