STORYMIRROR

Shila Ambhure

Fantasy

3  

Shila Ambhure

Fantasy

गमतीशीर गणित

गमतीशीर गणित

1 min
33.4K



गणित विषय

माझ्या आवडीचा

काढते त्यासाठी

वेळ सवडीचा ।।धृ।।


विषय वाटे हा

मजेशीर आता

आधी मात्र तोच

अवघड होता

बाई शिकविती

ग ग गणिताचा ।।१।।


गाणे गाऊनिया

अंक मी म्हणाले

गणिताची भाषा

सहज शिकले

तयार करते

पाढा हा आठाचा ।।२।।


वजाबाकी केली

काढून टाकून

बेरीज जमली

साहित्य मोजून

गठ्ठाही तयार

केला दशकाचा ।।३।।


वर्गीकरणाची

रित समजली

आकृतिबंधाची

ट्रिक उमगली

धडा शिकणार

मी गुणाकाराचा ।।४।।


घड्याळाचे काटे

सप्ताहाचे वार

आता नाही कधी

मी विसरणार

वापर करते

गणितपेटीचा ।।५।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy