Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Khedkar

Fantasy

3  

Neha Khedkar

Fantasy

चहा

चहा

1 min
137


सकाळ, दुपार ,संध्याकाळ किंवा 

रात्री झोपण्यापूर्वी असो

जिभेला जेव्हा वाटलं तेव्हा 

मनात आलं तेव्हा ,

आपण ठरवलं तेव्हा

मग तो अमृत तुल्य असो,

की हाताने बनवलेला असो

चहाला काही काळ वेळ नसतो...!


कधी रात्री जागून अभ्यास करायचा 

म्हणजे चहा हवा असतो,तर

कधी मैत्रीण घरी आल्यावर

तिला सोबत म्हणन चहा हवा असतो.89

तर कधी कॉलेजमध्ये मित्रांना कंपनी म्हणून

कटिंग म्हणून चहा हवा असतो...

चहाला काही काळ वेळ नसतो...!


कधी आमच्याकडे चहा प्यायला या,

म्हणून आमंत्रण चहा देत असतो,

तर कधी घरी आलेल्या पाहुण्यांना 

चहा घेतल्या शिवाय परतीचा मार्ग दाखवत नसतो.

थकलेल्या दिवसाला ताजेतवाने करण्यासाठी ,

कामाचे टेंशन जरा कमी करण्यासाठी

म्हणून चहा हवा असतो...

चहाला काही काळ वेळ नसतो...!


बाहेर पडणाऱ्या रिपरिप पावसात

मस्त अद्रकाचा चहा हवा असतो

तर कधी गोड गुलाबी थंडीत 

कडक मसालेदार चहा हवा असतो,

कधी रणरणत्या उन्हात 

इलायचीचा चहा हवा असतो

तर कधी आपल्या एकटेपणाच्या सोबतीला म्हणून

आपण बनवलेला चहा हवा असतो..

चहाला काही काळ वेळ नसतो...!


प्रियकर-प्रेयसीने गप्पांना रंग चढण्यासाठी

एकाच कपात मिळून घेतलेला चहा असतो

तर कधी बायकोचा नाकावरचा राग घालवण्यासाठी

नवऱ्याने बनवलेला प्रेमळ चहा असतो..

शेजाऱ्यांसोबत,मित्रांसोबत, 

ऑफिसच्या कलीग सोबत,

एकत्र जमलेल्या कुटुंबा सोबत

एक घोट चहा असरदार असतो..

चहाला काही काळ वेळ नसतो...!


कमी गोड, थोडं दूध जास्त चालेल पण

पत्ती थोडी जास्त झाल्या शिवाय

फक्कड चहा घेण्यात मजाच नाही..

विष म्हणा, अमृत म्हणा

कोणी कितीही वाईट म्हटले तरी चालेल

आपण लक्ष द्यायचे नाही..

आपण ठरवलेल्या वेळी

एक कप चहा घेतल्या शिवाय राहायचे नाही..

सुख, दुःखात, आठवणी ताज्या करण्यात 

चहा ला काहीही पर्याय नसतो..

म्हणून तर चहाला काही काळ वेळ नसतो...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy