STORYMIRROR

Neha Khedkar

Classics Fantasy Inspirational

2.3  

Neha Khedkar

Classics Fantasy Inspirational

मागे वळून पाहताना

मागे वळून पाहताना

1 min
156

दिसायला असेल माझी शाळा

दगड, विटा, माती सिमेंटची,

आज इथे आल्यावर समजलं

हीच तर खरी जागा संगोपनाची...


इथेच शिकले, वाढले, खेळले

आणि मन भरून बागडले ,

इथेच हरुन पुन्हा जिंकले

आणि सर्वार्थाने इथेच घडले...


 नेहमीच आपल्यासाठी अनेक स्पर्धा खुल्या होत्या

मात्र तेव्हा हरण्याची भिती वाटत नव्हती,

शिक्षणाबरोबरच इतरही क्षेत्रात

शिक्षकांकडून मिळालेली कौतुकाची थाप कमी नव्हती...


आहेत अजूनही ताज्या त्या आठवणी

हळुवार मनात घरटे साठवूनी,

पटकन् फिरतात कधी माझ्या भोवती

खरं तर आज हरवले मी त्यांच्या भोवती...


म्हणून वाटतंय, क्षणो क्षणी मन अल्लडपणात गावं

मोठेपण जगतांना लहानपण पुन्हा जगावं

अनोळखी ही दुनिया सारी तरीही

हृदयात साठवून ठेवता येईल असं बालपण पुन्हा हवं..



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics