पोरी_जरा_जपून..
पोरी_जरा_जपून..
लहानपणी आई म्हणायची
अग पोरी जरा जपून
जाता येता सतत सूचनांचा वर्षाव ,
फक्त माझ्या काळजीपोटी म्हणून...!
संध्याकाळचा सातचा काटाल्या,
काही करुन घरात हवी
जर कधी चुकला काटा ,
बोलणे खायची तयारी हवी..!
कॉलेजला गेले असले तरी,
सलवारसूट वर ओढणी घेऊनच
जीन्स घेऊन मागितला तर,
नको गं राणी, जरा जपूनच...!
तेव्हा वाटायचं किती बंधने घालते
आई आपल्या उठण्या बसण्यावर
आज स्वतःच्या मुलीला बघून वाटलं
भरवसा नाही आता कोणावर...!
आजच्या निष्ठुर धावपळीच्या जीवनात
साधे भोळेपणे राहून चालणार नाही
लोकांच्या नजरेची पारख हवी
ह्याची शिकवण देणे विसरायच नाही..!