STORYMIRROR

Neha Khedkar

Fantasy

3  

Neha Khedkar

Fantasy

असंच होतं ना तुलाही.

असंच होतं ना तुलाही.

1 min
129

समोर आली माझ्या की 

काहीच कळत नाही

दूर निघून गेल्यावर मात्र

हृदयाची तळमळ थांबत नाही..

सांग, असंच होतं ना तुलाही...?


आठवण आली तुझी की

मन कासावीस होतं..

तू सोबतीला नाही म्हणून

सारं जग परकं होतं..!

सांग, असंच होतं ना तुलाही..?!


भेट झाल्यावर आपली

भांडण केल्याशिवाय राहत नाही

मात्र दोघां मधील अबोला मग

फार काळ टिकत नाही

सांग, असंच होतं ना तुलाही..?!


माझ्या चेहऱ्यावर हसू

तुझ्या शिवाय खुलत नाही..

मनापासून व्यक्त होण्यासाठी

तुझ्या शिवाय कोणीही नाही..!

सांग, असंच होतं ना तुलाही..?!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy