STORYMIRROR

Kamlesh Sonkusale

Fantasy

3  

Kamlesh Sonkusale

Fantasy

जीवन

जीवन

1 min
26.9K



जीवन म्हणजे

प्रीतीचं प्रेमगाणं

गुणगुणावं ते

प्रत्येक हृदयानं


जीवन म्हणजे

दृढ भरवसा

चेहऱ्यावर जणू

चांदण्याचा कवडसा


जीवन म्हणजे

पाण्यावरील बुडबुडा

विरहामध्ये होतो

जीव थोडा - थोडा


जीवन म्हणजे

साडीवरील झालर

प्रेमगीत गावं

सांजकाळी क्षणभर


जीवन म्हणजे

बेधुंद नशा

'कवन'साठी जगावं

हीच आशा


जीवन म्हणजे

पात्यावरील दवं

जग सोडताक्षणी

हसत मरावं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy