STORYMIRROR

अबोल नयन

Romance Fantasy

3  

अबोल नयन

Romance Fantasy

मनाची चावी...

मनाची चावी...

1 min
12.1K

तूच माझ्या मनाची चावी,

रहस्य माझ्या जीवनातले 

तुझ्याच समोर खुलावी,


तुझ्या पावलांनी

दुःखाची बाग 

सुख सुमनांनी फुलावी,


रडका चेहरा माझा 

निखळ हसून खुलवी,

प्रत्येक क्षणी तुझी 

साथ मला मिळावी,


चुकता मी तूच 

माझ्यावर रुसावी,

माझं मन तुझ्याच 

सामोरी मोकळं होई,


चेहरा बघताच माझा

क्षणार्धात तू माझं मन ओळखून घेई,


दुःखात असता मी 

अश्रू तुझ्या नयनी पाझरावी,


जीवनातल्या प्रत्येक क्षणाची पतंग 

ह्या नभी सोबत उडवावी,


तूच माझ्या दिलाची चावी

अखेरचा श्वास अन् तूच समोर असावी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance