STORYMIRROR

काव्य रजनी

Fantasy

3  

काव्य रजनी

Fantasy

इच्छा

इच्छा

1 min
11.9K

स्वप्नात माझ्या आले

मी आकाशी निघाले

नुकतेच मन हे माझे

का मोहरून गेले


ते पांढरे ढगही

देती मलाच टाळ्या 

दाटीच झाली त्यांची

पाऊस तो पडाया


स्वप्नात माझ्या आले

मी चिंब चिंब न्हाले

चांदण्याच्या राणीला ही

हितगुज माझी घाले


मी एकटीच नव्हते

होत्या कितीक राण्या 

देखण्या किती त्या होत्या

मज आले ओ हासाया


स्वप्नात माझ्या आले

मी जणू परीच झाले

आकाशी पहुडले

पंख लावून मी निघाले


भलतीच इच्छा माझी

मग आज पूर्ण झाली

कित्येकदा मनाने ती

आडकाठी केली


स्वप्नात माझ्या आले मी 

चांदोबावर रुसले

हळूच तो म्हणाला

बाळा मी आहे तुझा मामा

मी आहे तुझा मामा


अलगद जाग आली

मी स्वप्नात हो विरली 

कधी होणार नाही खरे

अशी मनाला साद घाली...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy