STORYMIRROR

Jyoti gosavi

Fantasy

3  

Jyoti gosavi

Fantasy

रुसलेला शृंगार

रुसलेला शृंगार

1 min
12.1K

टिकल्या आणि पावडर

 यांनी घातला गळ्यात गळा

म्हणून लागल्या आमचा

 हिला केवढा होता लळा

 पण आजकाल मात्र करते 

मेकअप चा कंटाळा


नारंगी गुलाबी 

चॉकलेटी लाल

साऱ्या लिपस्टिकने

 फुगवले गाल


आमच्यामुळे हिचे 

ओठ लाले लाल

पण आजकाल आमचे

 झालेत हाल

आम्हाला आता कोणी

 विचारत नाही

किती दिवस आम्हाला

 डब्यात ठेवणार बाई

आम्हाला तू आता

 विसरली खास

तुझ्या चेहऱ्यावर बारा

 महिने दिसतो मास्क


सॅनिटायजरने धुवून धूवून

 नखे झाली काळी

आता रुसण्याची होती 

नेल पॉलिश ची पाळी

कधीकाळी होता

 आमचा किती मान

रंगीबेरंगी साड्यांवर

 मॅचींग ची शान


नंतर बाहेर आले

 सोन्या मोत्याचे हार

आम्हाला तर हिने

केलय तडीपार

लग्न नाही मुंज नाही

 नाही साखरपुडा

कोणतेही नववधू सध्या

भरे ना हिरवा चुडा

तिजोरीत राहून राहून

 गुदमरला आमचा श्वास

हिने मात्र चेहऱ्यावरती

लावलाय आपला मास्क


कपाटातून बाहेर आल्या

 रंगीबेरंगी साड्या

आधी नंबर कोणाचा म्हणून

भांडू लागल्या वेड्या

कॉटन वरती भारी पडली कांजीवरम साडी

इरकली ची काढली

 नारायण पेठने खोडी

बनारसची बनारसी

राजस्थानची बांधणी

नऊवारी शोभली मध्ये

 शुक्राची चांदणी

येवल्याची पैठणी म्हणाली

 मी सर्वांची राणी

पण आपल्यावर सध्या

 रुसली घरातली राणी

बाहेर जाताना घालते

 साधारण से कपडे

चेहऱ्याला बांधते स्टोल

आपलं जगणं होतंय

 कपाटात मातीमोल


राणी म्हणाली गप्प रहा

आहे त्या जागी पडून रहा

नट्या मुरण्याचा सीजन 

पुढच्या वर्षी पण येईल

आता मात्र आपला

हकनाक जीव जाईल

साडीत मेकअप 

 आणि दागिन्यात

अडकून करोणा येईल घरात

आपल्या सर्वांच्या जीवाला

 होईल धोका

म्हणून घरात राहूनच

जीव आपला राखा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy