फुल आणि पाखरु
फुल आणि पाखरु
वेडी एक कळी
वयात ऐनवेळी
जागली रात्रीला
फुलली सकाळी.
मोहरली पाकळी
दरवळ आभाळी
फुलपाखरू आले
ओढीने दरवळी.
मैत्री ही आगळी
होती जरी कोवळी
द्रुष्ट् अशी लागली
कुणी केली कागाळी.
एक एक पाकळी
तुटली सायंकाळी
आळ झेली पाखरु
सौख्य नसे भाळी..