माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र
माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र
माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र असवा
लोकशाहीच्या दौलतीचा रक्षक शान
समता, स्वातंत्र्य, शिक्षण, हक्क अशा
अधिकारांनी उंचावणारे राज्य महान...
महाराष्ट्र माझा संपन्न अशा माय भूमीचा
गौरव व्हावा अनेकानेक कलागुणांचा
जिथे सदा गाजावा नित्य मधुर पोवाडा
विविध भाषांच्या रूढी नि परंपरांचा...
कितीतरी महामानवी व्यक्तिमत्त्वांचे
रंगावे स्वप्नरंजित भविष्य या कुशीत
सह्याद्रीच्या डोंगर माणुसकी कडयात
बंधुभावाचे बीज उमलावे खुशीत...
जाती,धर्म,वर्ग बहुविध नांदावेत, सोबत
पर्वतरांगा,नदया,गड-किल्ल्यांचा वारसा
मिटवणारा मनामनातील कुंठित दुरावा
निसर्ग सौंदर्याचा भुलवणारा हा आसरा...
प्राणी अभयारण्यांचा नि जंगल वनांचा
एकत्रित संग्रहालयांचा चाखता यावा मेवा
संग्रहित ग्रंधसंपदा नि थोर साधुसंतांचा
उत्कृष्ट लोककलेच्या संस्कृतीचा ठेवा...
विकासाच्या संकल्पनेत मुरता मुरता
औद्योगिक क्षेत्रांची व्हावी खूप भरभराट
राष्ट्रराज्याची पवित्रता राहावी टिकून
नसावी अंतरी मिटण्याची उगा घबराट...
