STORYMIRROR

Sanjay Gurav

Romance Fantasy

3  

Sanjay Gurav

Romance Fantasy

आज अचानक

आज अचानक

1 min
12K

आज अचानक...

कळी काट्यास बिलगली

काट्यासही असते हृदय

बिलगल्यानंतर उमगली.


एका वाटेवरचे सोबती

ती आवडती हा बदनाम

फुलताना पाहायचा रोज

परि भावनांना होता लगाम


खुडताना कळीस कुणी

काट्याने घायाळ करावे

फुलण्याआधी बिचारीला

का लागते बरे तुटावे..?


काट्यास झाली शिक्षा

खुनाची अपराध्यांच्या

कळीस उमगली प्रीत

आसवांना पाहता त्याच्या


प्रेमाची फांदी झुकली

प्रीत काटेरी जिंकली

आज अलगद कळी

काट्यास त्या बिलगली.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance