शब्दस्वप्न
शब्दस्वप्न
आज रात्री मी झोपेत एक
छान असं स्वप्न पाहिलं,
आणि हे स्वप्न कायम स्वरूप
आठवणीत माझ्या राहिलं...
सोलो ट्रीप म्हणून बाहेर
गावी गेलेलो मी फिरायला,
फिरून मी थकणार म्हणून
रूम घेतली रात्री राहायला...
रात्रीचं हॉटेल मध्ये आणि
पूर्ण दिवस बाहेर मी राहायचो,
जो पर्यंत थकत नाही तो
पर्यंत अख्खं जग मी फिरायचो...
असच एक दिवस फिरताना
एका मुलीशी भेट माझी झाली,
कदाचित तेव्हा पासूनच प्रेम नक्की
काय असतं हेची जाणीव मला आली...
एकमेकांना ओळखत नसून
दोघांचे सुर कसे जमले माहीत नाही,
सर्वांना आपलसं करून घेतो मी
माझा स्वभाव आहे असा काही...<
/p>
एक दिवस मोकळं फिरण्यासाठी
अभ्यासापासून सुट्टी तिने घेतलेली,
आणि त्या दिवसभरात फिरण्या
साठी साथ मला तिची भेटलेली...
दिवसभर एकत्र फिरून
आम्हाला खूप आळस आलेला,
आळस घालवण्यासाठी
चाई पिण्याचा वेळ आता झालेला...
चाय पीत असताना
बिचारी होती खूप दमली,
आम्हाला पाहून काका म्हणाले
छान जोडी तुमची जमली...
मग आम्ही गार्डन मध्ये जाऊन
तिला मी एका ठिकाणी बसवले,
आणि बरोबर तिच्या शेजारी
मी माझी पाठ जमिनीला टेकवले...
पाठ टेकवत असताना पावसाची
सर जणू माझ्या चेहऱ्यावर आली,
चेहऱ्यावर पाणी शिंपडून आई
म्हणाली उठ आता सकाळ झाली...