STORYMIRROR

Dhaval Kadam

Romance

3  

Dhaval Kadam

Romance

मन मोकळं प्रेम

मन मोकळं प्रेम

1 min
259

मन मोकळे, प्रेम करून

जगावं असं मला वाटतं,

भरभरून तिच्यासोबत

बोलावं असं मला वाटतं...


विषय नसला तरी येड्या 

सारखे आपण बोलायचो,

तुझ्या प्रेमाच्या फांदीवर

मन मोकळे मी डोलायचो...


डोलता डोलता तुझ्या प्रेमात

पडावं असं मला वाटतं,

मन मोकळे, प्रेम करून

जगावं असं मला वाटतं...


तिला सोडायची गोष्ट करताच

हातात हात माझ्या धरायची,

" धवल तू खरच वेडा आहे "

अश्या शब्दात मला ओरडायची...


आवाज तिचे ऐकावे, वाट 

बघावं असं मला वाटतं,

मन मोकळे, प्रेम करून

जगावं असं मला वाटतं...


घरी जाताना " नको ना जाऊ "

हे वाक्य मनात तिच्या असते,

मला वाईट वाटू नये म्हणून

बाहेरून माझ्यासाठी हसते...


हसता हसता सारं जग

फिरावं असं मला वाटतं,

मन मोकळे, प्रेम करून

जगावं असं मला वाटतं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance