खूप सुंदर तू दिसायची
खूप सुंदर तू दिसायची


आठवतंय रे अजून मला
की खूप सुंदर तू दिसायची,
बघताच क्षणी तुला, माझ्या
हृदयावर घाव तू करायची...
माहीत आहे अशी ही जखम
लवकर बरी नाही व्हायची,
कारण माझ्या रोगाचा औषध
तू तुझ्याकडेच ठेवायची...
माझ्या जखमेवर उपचार
करायला गोड तू हसायची,
आठवतंय रे अजून मला
की खूप सुंदर तू दिसायची...
टिकलीची शोभा वाढवायला तू
तिला तुझ्या कपाळाला लावायची,
अन् केस मोकळे करताच जणू
स्वर्गातील अप्सरा तू भासायची...
तुझ्या केसा सोबत खेळायला
वेगळीच मजा मला यायची,
आठवतंय रे अजून मला
की खूप सुंदर तू दिसायची...