खांद्यावर डोकं
खांद्यावर डोकं
ती माझ्या खांद्यावर तिचं
डोकं ठेवून बसली होती,
मला वाटायचं जणू ती
माझ्या प्रेमात फसली होती...
तिने मला विचारले का रे
येवढं जीव लावतो माझ्यावर ?
लगेच मनाने सांगितले तिला
"प्रेम जे केले आहे तुझ्यावर".
हे ऐकून ती माझ्याकडे
बघून प्रेमाने हसली होती,
ती माझ्या खांद्यावर तिचं
डोकं ठेवून बसली होती...