STORYMIRROR

Dhaval Kadam

Tragedy

3  

Dhaval Kadam

Tragedy

प्रेमाचा हात

प्रेमाचा हात

1 min
318

आम्ही एकमेकांनी एकमेकांना

एकमेकांचा हात दिला होता...

आम्हाला पाहून सूर्य जणू हसत 

हसत अस्तमानी गेला होता...


चारी दिशा मध्ये आजुन 

काळोख पडायचं बाकी होत...

पण आम्ही आता दूर होणार

म्हणून मनाला रडायचं बाकी होत...


दोघांच्या मनाने देखील रडताना

एकमेकांचा साथ दिला होता...

आम्ही एकमेकांनी एकमेकांना

एकमेकांचा हात दिला होता...


रडून रडून थकून एकदा ते

डोळे मात्र शांत होणार होते...

पण माझे मन हे वेडे परत 

मला तिच्या कडे नेहणार होते...


आम्ही दूर राहून एकत्र येऊन

वेड्या मनाला मात दिला होता...

आम्ही एकमेकांनी एकमेकांना

एकमेकांचा हात दिला होता...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy