कोंकण चा प्रवास
कोंकण चा प्रवास
कोंकण रेल्वेतला प्रवास
म्हणजे वेगळीच मजा असायची,
आजू बाजू ची अनोळखी
माणसं आपलीच होऊन जायची...
सकाळी दिव्याला गाडी
असायची त्याने आम्ही जायचो,
संध्याकाळी पोहोचे पर्यंत
गाडीत खूप मजा करायचो...
गाडीत गर्दी असल्याने
मला खूप कंताळ यायचा,
सुंदर चेहरा दिसताच तो
कंताळ चुपचाप निघून जायचा...
त्या चेहऱ्याचे वर्णन मी
शब्दात नाही करू शकत,
एवढा सुंदर चेहरा होणार
नाही रे शब्दात प्रकट...
तिच्याशी संवाद साधायचा
हा विचार मनात घेतला,
संवाद साधताच छान
प्रतिसाद मला भेटला...
संवादाची सुरुवात मी
"ताई" ह्या शब्दाने केली,
सर्वांना भावंडं मानतो
हीच माझी वेगळी शैली...
>
तिला ताई म्हणालो आहे तर
भावा सारखं वागावं लागेल,
तिच्या हातात जड समान बघून
माझी जागा तिला द्यावी लागेल...
मग पुढच्या स्टेशन ला
तिच्या बाजूचा माणूस उतरला,
लगेच "भाऊ इथे जागा आहे"
हा आवाज माझ्या कानी गुंजला...
तिच्या बाजूला बसून
बरेच काही विषय निघाले,
तिच्याशी बोलत असताना
समजले नाही कधी स्टेशन आले...
ती बोलली ताई बोललास
मला जणू बरे वाटले,
आजुन माणुसकी आहे
आज मला खरे वाटले
ताई हा शब्द घेताच
ती खूप खुश झाली,
खुशीच्या भानात मग
ती म्हणाली मी प्रणाली...
आमचं स्टेशन येय पर्यंत
बरेच गप्पा आमचे झाले,
पण गप्पा मारताना मध्ये
आले ते म्हणजे फेरीवाले...