स्वल्पविराम ....
स्वल्पविराम ....
आयुष्य कधी कधी असं का असतं..
सरळ मार्गानं चालता चालता ...
क्षणभर... थांबवून विचार करायला
का भाग पाडत....
आणि मग त्या क्षणापासून...
आपला मार्गच का बदलावा....
ओळखीचा तो मार्ग चालता चालता...
मध्येच का सोडवा...
आपले वळण का बदलावे ...
हा आयुष्याचा स्वल्पविराम...
कधी आपल्याला आपल्या आयुष्याला
पूर्णविरामापर्यंत घेऊन जाऊ शकतो....
त्याला फक्त क्षणचा अवलंब असतो....