असेही दिवस
असेही दिवस
1 min
111
ह्याचीच वाट पहिली होती
ह्याचाच ध्यास लागला होता...
आले ते क्षण उंबरठ्याशी
ओथंबून...
निमित्त कोणाचेही का असेना
वेळ आज मिळाली होती
नुकतेच घरातच नाही
मुलातही होती
शांततेची ती कल्पना
आज पूर्ण जहाली होती
स्वछ वारा ... रुणझुणणारा
राखराखणारे ते प्रखर किरणही
खूप काळातच लाभले होते..
किती रिकामपण ... कसा घालवावे
कल्पक्तेने सर्वांनाच ते सुचले होते
कधी गप्पा, कधी गमती, कधी चित्रे,
कधी घरातलीच भ्रमंती
Advertisementclass="ql-align-center">इतके निरखून स्वतःचेच घर
पाहावयास मिळाले
कधी स्वयंपाक नकोस जहालेला
आज पंचपक्वान्न रंगून लागली होती
घडाळ्याच्या काट्या समवेत
धावणाऱ्या आयुष्याला
जरासा विरंच लाभला होता..
स्वतःच्याच स्वभावाचा जणू
स्वताःलाच आरसा जाणवला होता
खूप वर्षांनी जणू मुलांच्या त्या खिळखिलणाऱ्या आवाजाला
त्याच्या गोडव्याला ... पुन्हा अनुभवले होते..
एकाचे काम आज चौघात वाटले होते
मुलांच्या मदतीचा तो उरक
अधिकच्याच कामाचा गमतीदार हिस्सा बनला होता
तो रोजचा शांत सूर्य, येणाऱ्या मंद संध्येला रात्रीत जणू जळत होता...
तो रोज नवीन सकाळ दाखवत होता.. नवीन अशा जागवत होता..