आठवतयं
आठवतयं


तुझे ते शब्द....
अजून कानातच रेंगाळतात,
आणि तो चेहरा....
अजून समोरच राहतो,
तुझी ती नजर....
अजून माझ्यावर खिळलेली,
तुझं ते हसणं....
अजून मला भूलवतयं,
तुझी ती आठवण....
अजून माझ्या स्मरणात, मनात,
तुझा तो खोडकरपणा....
अजून त्रासावतोय,
तुझं ते प्रेम....
अजून सतत आठवतयं....